जन्मपत्रिका

आपल्या जन्माच्या वेळची आकाशस्थ स्थिति म्हणजे आपली जन्मपत्रिका. या जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला आपल्या जन्मदिवसाचे पंचांग, जन्मलग्न कुंडली, राशि कुंडली, जन्मकालीन महादशा व अंतर्दशा, भावचलित कुंडली, जन्मकालचे स्पष्टग्रह, जन्मकाली ग्रहांचे एकमेकांशी होणारे प्रमुख योग आणि होरा, द्रेष्काण, सप्तमांश, नवमांश, द्वादशांश, त्रिंशांश, दशांश, षोडशांश आणि षष्ठ्यांश अशा नऊ प्रकारच्या कुंडली (दशवर्ग) ही माहिती असेल. जन्मपत्रिका बनविण्यासाठी आपला जन्म दिनांक, जन्म वेळ आणि जन्म गांव (अक्षांश, रेखांश) ही माहिती आवश्यक आहे. ह्या माहितीशिवाय अचूक जन्मपत्रिका बनविता येत नाही. परदेशामध्ये जन्म असल्यास प्रमाण रेखांश आणि डे लाईट सेविंग टाईम किंवा समर टाईम सुरु असल्यास त्याचा उल्लेख अवश्य करावा.